संघटीत महाराष्ट्र

Free Fall Jumping चा वर्ल्ड रेकॉर्ड मोडण्यासाठी तब्बल ६५ मिलिअन डॉलर्स खर्ची घातले पण...!



आपल्या मराठी उद्योजकांना व्यवसायात अधिक प्रगती आणि आपले स्थान निर्माण करण्यासाठी, प्रेरणा घेऊन आपल्या मराठी उद्योजकांची ख्याती  जगभर पसरवण्यासाठी संघटित महाराष्ट्र घेऊन आले आहे, एक आगळीवेगळी case study...! 
पण त्या आधी आमच्या फेसबुक पेज ला लाईक करायला विसरू नका ! 💪
   

जर का तुम्ही Red Bull ला फक्त प्रोडक्ट म्हणून बघितल तर ते एक नॉन अल्कोहोलीक एनर्जी ड्रिंक असून, जगातील Tastiest Drink किंवा Healthiest Drink सुद्धा नाही..😅     

पण तरी सुद्धा Red Bull प्रत्येक वर्षी  बिलीयन डॉलर्सची कमाई कशी काय करू शकतो ?😮

हे सर्व शक्य होते ते केवळ आणि केवळ मार्केटिंग स्ट्रेटीजीसमुळे..😇

कस काय ?

तुम्हाला माहित आहे का  Red Bull ने  Free Fall Jumping चा वर्ल्ड रेकॉर्ड मोडण्यासाठी ६५ मिलिअन डॉलर्स खर्ची घातले होते ?😨

२०१२ साली Red Bull  एक नवीन प्रोजेक्ट घेऊन आला होता, त्या प्रोजेक्टचे नाव होते Stratos Project.


ज्यामध्ये त्यांनी सर्वाधिक उंचावरून उडी मारणाऱ्या मनुष्याचा रेकॉर्ड मोडण्याचा निर्णय घेतला. 
त्यानुसार जमिनीपासून १,२८,१७७ फूट (जवळ जवळ ४० किलोमीटर) उंचावरून म्हणजेच पृथ्वीच्या स्ट्रॅटोस्फीयरमधून एका मनुष्याला free fall jump साठी  तयार करण्याचे ठरवले.

या पराक्रमासाठी त्यांना फेलिक्स बामगार्टनर (Felix Baumgartner) या नावाचा एक प्रोफेशनल स्कायडाइव्हरला तयार केले गेले.


फेलिक्स बामगार्टनरचा  सर्वाधिक उंचावरून उडी मारणाऱ्या मनुष्याचा रेकॉर्ड मोडण्याचा सराव चालू झाला.
या पराक्रमाच्या पूर्व तयारीसाठी आणि सोशल मिडिया कँम्पेंगसाठी Red Bullने तब्बल ६५ मिलिअन डॉलर्सहून अधिक खर्ची घातले. 😨

Red Bullच्या या कारनाम्यावर प्रत्येक जण त्याला वेड्यात काढत होते.😂😁
 
प्रत्येक जण बडबडत होता की Red Bull विनाकारण या एनर्जी ड्रिंकसाठी ६५ मिलिअन डॉलर्सहून अधिक  खर्ची घालत आहे.

अखेर १४ ऑक्टोबर २०१२ साली सर्वाधिक उंचावरून उडी मारण्यासाठी फेलिक्स बामगार्टनरला एक विशेष यंत्रामध्ये बसवले गेले.

मग ते यंत्र एका मोठ्या हवेच्या फुग्याच्याला बांधून अवकाशाच्या दिशेने सोडून देण्यात आले.

त्यानंतर फेलिक्स बामगार्टनर यांनी जमिनी पासून  १,२८,१७७ फूट उंचावरून जमिनी पृथ्वी च्या दिशेने उडी घेतली..😨


४० किलोमीटर उंचीचे अंतर त्याने फक्त ९ मिनिट ०३ सेकंदात अगदी सुखरूप पार केले आणि व्यवस्तीत रित्या  लैंडिंग करून दाखवले.😎


आणि जगातील सर्वाधिक उंचावरून उडी मारण्याचा रेकॉर्ड त्यांनी आपल्या नावावर केला.
या पराक्रमासोबत त्याने आवाजाच्या प्रवाहाचा देखील रेकॉर्ड मोडला आणि असा पराक्रम करणारा तो पहिला मनुष्य ठरला..💪

मग ६५ मिलिअन डॉलर्स खर्च करून  याचा  Red Bull ला काय फायदा झाला असेल ..?😉
तर.. 
तब्बल ८ मिलियन प्रेक्षकांनी हा कार्यक्रम Youtube ला लाईव्ह पहिला ..इतिहासात पहिल्यांदाच इतक्या प्रेक्षकांनी लाईव्ह स्ट्रीम पहिली आहे ..!😧

तसेच ५२ मिलियन वेबकास्ट विव्ह, ७० टी.व्ही. स्टेशन, ३.२ ट्विट्स, ७२ हजार #redbull नोंद , २२ हजार इंस्टाग्राम फोटो 
आणि 
१ लाख 30 हजारहून अधिक फेसबुक शेअर ..💪
तसेच सोशल मेडियावर अधिक व्हायरल झाल्यामुळे अनेक वृत्तवाहिन्यानीआणि वृत्तपत्रांनी या वर्ल्ड रेकोर्ड ची  दखल घेतली..आणि 
आश्चर्यकारक सत्य हे कि
Red Bullने  ६५ मिलिअन डॉलर्स खर्ची घातले होते पण काही रिपोर्ट च्या अनुसार त्यांना १ बिलीयन डॉलर्स पेक्षा अधिकची पब्लिसिटी मिळाली..💪
आणि याचा सेल्स वर देखील फरक पडला ..
या कार्यक्रमा नंतर Red Bullचा सेल्स ७ % नी वाढला आणि पहिल्या ६ महिन्याचा रेवेन्यु तब्बल १.६ बिलीयन डॉलर्स चा दिसून आला.💪

Red Bull कंपनीने हे असे आश्चर्य करणारे कृत्य पहिल्यांदाच नव्हे तर वारंवार करत असते. 
एक फुटबॉल टीम त्यांनी २५ कोटी ला विकत घेतली होती आणि त्यांची किंमत आज ३०० कोटींच्या घरात आहे. शिवाय स्पोर्ट्स क्षेत्रात त्यांच कायमच योगदान असते, Racing Events, Music events या क्षेत्रात देखील अग्रेसर आहे.😎 
गुरिल्ला मार्केटिंगच उत्तम उदहारण म्हणून Red Bull कड़े नेहमीच पहिला जात.


आपण काय आहोत आणि जगाला आपण काय दाखवतो, आपल्या product वरील विश्वासच आपल्या product ला ब्रांड बनवू शकतो.
Red Bull ने आपला ग्राहक वर्ग ओळखून तरुण वर्गाला अल्कोहोलला पर्यायी पेय Red Bull म्हणून एक ओळख निर्माण केली आहे.


७-८ रुपयांत तयार होणारे हे ड्रिंक आज बाजारात १२०-१२५ रुपयांना मिळत आहे.कारण apple कंपनी जश्या किंमती आकारते त्याच प्रकारे ते product सुद्धा दर्जेदार देते त्याच प्रकारे Red Bull हि करत आहे. किंमत जास्त असल्याने लोकांत असा समाज आहे कि हे ड्रिंक प्रत्तेक जन विकत घेऊ शकत नाही तसेच Red Bull पिल्याने proud आणि रॉयल असल्याच फील होते त्यामुळे लोक आहे त्या किमतीत Red Bull विकत घेणे पसंत करतात.


माहिती आवडल्यास नक्की कळवा..
जास्तीत जास्त मराठी उद्योजकांना शेअर करा..
अशाच नवनवीन माहितीसाठी आजच आमच्या फेसबुक पेजला लाईक करा..👉   
संघटीत महाराष्ट्र
"जोडुया नाते आपुलकीचे..मराठी उद्योजकांचे आणि ग्राहकांचे"  

अधिक माहितीसाठी आज संपर्क करा :-
संघटीत महाराष्ट्र
sanghatitmaharashtra@gmail.com
७३५०६७८४७२ / ८०९७०४१५७१

Post a Comment

0 Comments