२५ वर्षांपासून एकच रेट असला तरीही फायदा कसा होऊ शकतो ?

आपल्या मराठी उद्योजकांना व्यवसायात अधिक प्रगती आणि आपले स्थान निर्माण करण्यासाठी, प्रेरणा घेऊन आपल्या मराठी उद्योजकांची ख्याती  जगभर पसरवण्यासाठी संघटित महाराष्ट्र घेऊन आले  आहे, एक आगळीवेगळी case study...!

पार्ले-जी भारतात उत्पादन होणाऱ्या बिस्किटांचा प्रकार आहे. पार्ले कंपनीचे हे बिस्किट नील्सन सर्वेक्षणानुसार, २०११मध्ये जगातील सर्वात मोठी बिस्किटांची ब्रॅंड आहे.

सुरुवातीला आपण पार्ले प्रॉडक्ट्सच्या इतिहासा बद्दल थोडे जाणून घेऊयात...!  👀
पार्ले प्रॉडक्ट्सची स्थापना १९२९ मध्ये मुंबईच्या विलेपार्ले उपनगरात मिठाई बन कंपनी म्हणून झाली. १९३९ मध्ये पार्ले प्रॉडक्ट्सने बिस्किटांची निर्मिती करण्यास सुरवात केली. १९४७ मध्ये जेव्हा भारत स्वतंत्र झाला तेव्हा कंपनीने बिस्किटचा ग्लूको ब्रँड प्रदर्शित केल्याने जाहिरात मोहीम सुरू केली.😇 

ब्रिटिश-ब्रांडेड बिस्किटांना भारतीय पर्याय. पार्ले-जी बिस्किटांना पूर्वी १९८० पर्यंत 'पार्ले ग्लुको' बिस्किट म्हटले जायचे. पार्ले-जी नावाच्या "जी" मूळतः "ग्लूकोज" साठी उभे होते,😳 नंतरच्या ब्रँड स्लोगनमध्ये "जी फॉर जीनियस" देखील म्हटले गेले. २०१३ मध्ये, पार्ले-जी किरकोळ विक्रीतील ₹ ५,000 कोटींचा आकडा पार करणारा भारताचा पहिला एफएमसीजी ब्रँड बनला. २०१८-२०१९ रोजी या कंपनीने ₹८४८७ कोटींचा टप्पा पार करत यशाचा शिखरावर पोहोचली. 😱

श्री मोहन्लाल्जी दयाल १८८० मध्ये सुरतहून आपल्या १२ कुटुंबियांसोबत मुंबईत कारखाना सुरु केला आणि विशेष म्हणजे कारखाना सुरु करण्याचा उत्साहात ते प्रोडक्टचे नाव ठेवायलाच विसरले. 😅

कारखाना मुंबई पार्ले मध्ये होता म्हणून त्यांनी आपल्या प्रोडक्टचे नाव पार्ले ठेवले. नाव ठेवायला विसरले जरूर परंतु त्यांचे ध्येय मात्र निश्चित होते. 😎

जाणून घेऊयात कोणत्या अशा गोष्टी आहेत ज्यामुळे हि कंपनी आज संपूर्ण देशभर लोकप्रिय आहे. काय आहे यांच्या प्रगतीच गुपित ??? 😀
 

 Low Profit Margin :- 

कंपनी ला माहित होत कि पार्ले-जी हे बिस्किटंच आहे जे आपल्याला देशाचा काना-कोपर्यापर्यंत पोहोचवत आहे. त्यामुळे त्याचा किंमतीत बदल करून चालणार नाही हेच कारण आहे कि पार्ले आज प्रत्तेक घराघरात पोहोचला आहे. पार्ले जी च्या विशेष चवीमुळे हे बिस्किटं value for money ठरलं. 

पार्ले-जी कंपनीने मान्य केला कि जर आपल्याला लोकांचा मनावर अधिराज्य करायचं असेल तर किंमतीत वाढ करणे योग्य नाही आणि या प्रोडक्ट मध्ये low profit margin च ठेवायच. मग कंपनी ला profit कुठून होणार ???

 आणि म्हणूनच त्यांनी hide & seek, monaco, krack jack अशा काही brands ची निर्मिती सुरु केली.मग या प्रोडक्टचे प्रोफिट पार्ले-जी सोबत adjust करून नफा मिळविला. 
किंमत तीच पण वजन मात्र कमी महागाई च्या पार्श्वभूमीवर ज्यावेळी कच्चा मालाच्या दारात वाढ होऊ लागली त्यावेळी त्याच किंमतीत पार्ले-जी विकला गेला तर कंपनीला तोटा होण्याची भीती हि असणारच,
त्यामुळे ५० पैशांची दरवाढ पार्ले कंपनीने केली परंतु, लोकांना हे अमान्य होते त्यांनी जणू इंधन दर वाढी प्रमाणे प्रतिक्रिया दर्शवली आणि पार्ले कंपनी समोर दर कमी करण्याचे आव्हान केले.आपल्या ग्राहकांना नाराज करून कस चालेल मग या परिस्थितीवर उपाय म्हणून एक वेगळी शक्कल लढवण्यात आली. 
ती म्हणजे किंमतीत वाढ न करता वाजनात घट करण्याची!!! 
एकंदर त्यांचा लक्षात आले होते कि ग्राहकांना वजनाबद्दल तक्रार नाही तर किमतीबद्दल आहे आणि म्हणूनच पहिला पार्ले जी १०० ग्राम, ९० ग्राम , ८० ग्राम असे मिळत असे परंतु आता त्याच वजन हे मात्र ६५ ग्राम इतके कमी झाले विशेष म्हणजे ५५ ग्राम + १० ग्राम extra म्हणजेच आता पार्ले जी बिस्किट चे वजन फक्त ५५ ग्राम झाले मात्र किंमत तीच ५ रुपये !!! 

Buying Itenlligence 

कच्च्या मालाची कमी दारात खरेदी तेच प्रॉफीटआहे.कच्च्या मालाची खरेदी जितक्या कमी दारात कराल तितका जास्त नफा होणार हे सर्वांना माहित आहे. याच गोष्टीचा आधारावर पार्ले कंपनीने आपल्या कच्च्या मालाची खरेद हि एकदम स्वस्त आणि थेट ठेवल्यामुळे भारतातील सर्वात कमी किमतीत कच्चा माल खरेदी करणारी कंपनी ठरली आहे.याच कारणामुळे पार्ले जी आपल्या किमती स्थिर ठेवण्यात यशस्वी ठरला आहे.ग्राहकांना किंमत वाढीची झळ पोहोचू नये याची विशेच काळजी पार्ले कंपनी ने आपल्या buying itenlligence ने दाखवून दिले आहे.   



Operatinal Efficiency

पार्ले कंपनी ची उत्पादन कार्यक्षमता इतकी आहे कि त्यांचा wastage हा विचारात सुद्धा न घेण्यात्पद आहे. त्यांचा ११५ टन उत्पादनाला मात्र १% waste हा इतकाच आहे 

आणि इतकाच नव्हे तर employee productivity level वर kpi’s आणि kra’s खूप चांगल्या पद्धतीने तयार केल्या आहेत कि एकही कामगार आपल्या कामाच्या वेळ वाया घालवूच शकत नाही किवा कामचोरपना करू शकत नाही 

Low Packaging Cost 

आपले ग्राहक price sensitive आहेत हे कंपनीला चांगलेच माहित होते. त्यामुळे त्यांनी कमी दर्जाची packaging करण्यास सुरुवात केली.

Wax paper
काढून टाकून निव्वळ प्लास्टिकचा packaging मध्ये हे पार्ले जी बिस्किट सर्वत्र आज मिळत आहेत.त्यामुळेच आज पर्यंत packaging वर कोणत्याही प्रकारचा खर्च वाढवला नाही इतकाच नव्हे तर कवर वर असणाऱ्या मुलीचे चित्र देखी बदलले नाही.ग्राहकांना फक्त किंमत आणि चव याचाशीच संबध असल्यामुळे त्यांनी इतर कोणत्याच गोष्टींवर भर दिला नाही. 

Strategic Locations Of Factories 

पार्ले कंपनी ने आपले कारखाने मुंबई, कर्नाटक, राजस्थान, हरियाणा ज्या ज्या ठिकाणाहून देशाचा मोठा भाग व्यापू शकतो त्या त्या ठिकाणी त्यांनी कारखाने सुरु केले.त्यामुळे फायदा असा झाला कि logistics,warehousing,आणि इतर खर्च कमी होऊन उत्पादनांचा पुरवठा त्या त्या ठिकाणी वाढला आणि वार्षिक turn over सुद्धा वाढला. multiple price variant पार्ले-जी सर्व घराघरांत पोहोचल्यानंतर त्यांचा लक्षात आले कि भारतात आनेक प्रकारचे कुटुंब आहेत. २ माणसांच्या कुटुंबापासून ते अगदी joint family पर्यंत लोकांसाठी त्यांनी २ रुपयांपासून ते ५० रुपयांपर्यंत इतके products बाजारात आणले कि जेणे जरून एकही ग्राहक सुटला जाऊ नये

आणि ग्राहकांचा खिशाला ताण पडू नये याची विशेष काळजी पार्ले जी कंपनी ने घेतली. पार्ले जी कंपनी काळासोबत update राहत असून त्यांनी पुढे जाऊन बिस्किटं ची मागणी कमी झाल्यास काय करावे यांची देखील तयारी करून ठेवली चहा सोबत पर्यायी म्हणून पार्ले ने पार्ले premium rusk नावाचे प्रोडक्ट काढून चाहसोबत मार्केट तयार केले 

मग आता चहा सोबत बिस्किटं खा किवा rusk म्हणजेच छापा पण आपलाच आणि काटा पण आपलाच.तरीही हि कंपनी एवढ्यावर पण न थांबता पुढे candy चा क्षेत्रात सुद्धा मोलाची कामगिरी केली melody, poppins, mango bytes etc. 

सारख्या लोकप्रिय candy आज मार्केट मध्ये अधिराज्य करताना दिसतात. पुढे यांची वाटचाल डाळींचा व्यवसायात सुद्धा त्यांनी तयारी दर्शवली असून fresh harvest pulses या त्यांचा नवीन डाळींच्या ब्रांड चे नाव आहे. पार्ले जी कंपनी आता फक्त एका उत्पादनावर अवलंबून राहिली नाही.

यामधून काय शिकण्यासारखे आहे ?
ज्या वेळेस आपला ग्राहक वर्ग हा अधिक  price sensitive असेल ..त्यावेळेस आपल्या प्रोडक्टच्या किंमती बरोबर अधिक खिलवाड न करता प्रोडक्टच्या प्रोडक्शन वरील अतिरिक्त खर्च कमी करावा तेही प्रोडक्टची क्वालिटी न बदलता... तसेच इतर अधिक मार्जिन असलेले प्रोडक्ट काढून त्या प्रॉफीटमधून आपल्या मुळ प्रोडक्ट शी  adjust करून नफा मिळवावा..!  

माहिती आवडल्यास नक्की कळवा...
जास्तीत जास्त मराठी उद्योजकांना शेअर करा...

"जोडुया नाते आपुलकीचे...मराठी उद्योजकांचे आणि ग्राहकांचे"  

अधिक माहितीसाठी आज संपर्क करा :-

संघटीत महाराष्ट्र

sanghatitmaharashtra@gmail.com

७३५०६७८४७२ / ८०९७०४१५७१