संघटीत महाराष्ट्र

जादू रंगाची...... ताकद ब्रँडिंगची..!!!!! Case Study No 2

 


जेव्हा प्रतीस्पर्धी तब्बल १५० मिलिअन डॉलरची स्पॉन्सरशिप मिळण्यात यशस्वी होतो तेव्हा...

आपल्या मराठी उद्योजकांना व्यवसायात अधिक प्रगती आणि आपले स्थान निर्माण करण्यासाठी, प्रेरणा घेऊन आपल्या मराठी उद्योजकांची ख्याती  जगभर पसरवण्यासाठी संघटित महाराष्ट्र घेऊन आले  आहे, एक आगळीवेगळी case study...! 

२०१२ मध्ये संपूर्ण जगाला लंडन ऑलिम्पिक स्पर्धेची उत्सुकता लागली होती.

ऑलिम्पिक खेळ जागतिक स्तरावर आपली उपस्थिती बळकट करण्यासाठी शोधत असलेल्या ब्रँडसाठी एक आदर्श मंच आहे.

Adidas आणि  Nike  या दोन्ही ब्रँडमध्ये लंडन ओलिंपिक २०१२ च्या ऑफिशियल स्पोर्ट्सविअर पार्टनरच्या स्पॉन्सरशिपसाठी चढा-ओढ चालू असते..

आणि त्या चढाओढीत Adidas ही कंपनी तब्बल १५० मिलिअन डॉलरची स्पॉन्सरशिप मिळण्यात यशस्वी होते. 

ऑलिम्पिकच्या कार्यकारी संघांनी नवीन निमय देखील अमालात आणले होते ज्यामध्ये स्पॉन्सर ब्रँड व्यतिरिक्त इतर कोणता ही ब्रँड कोणत्याही प्रकारे ऑलिंपिकशी स्वत: ला संबंधित  करू शकत नाही..

यावरून प्रत्येक ब्रँड हाच विचार करत होता कि Adidas यावेळेस सर्व जगात वायरल होणार आहे आणि यावर्षी परत आपल्या सर्वांच्या वरचढ राहणार आहे..😨

पण Nike ला काही करून आपले स्पर्धे दरम्यानचे अस्तित्व लोकांना दाखवायचे होते.😨                         

                                             

 एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा... एखादा प्रश्न कितीहि गुंतागुंतीचा असला तरी एक ना एक मार्ग नक्कीच मिळतो ? असच सेम ऑलिम्पिक २०१२ मध्ये झाले.... 

Nike  ला प्रश्न पडला होता कि, आपल्याला स्पॉन्सरशिप मिळाले नसलं तरीही ऑलिम्पिकशी कसा संबध निर्माण करावा ? 

त्यामधूनच त्यांना ३ मार्ग मिळाले...त्यातील एक म्हणजे 

त्यांना असे समजले की, ऑलिंपिकचा प्रायोजक कोणीही असला तरीही खेळाडू त्यांना हवे असलेल्या शूज ची  निवड स्वत: करू शकतात...!

बाकीचे २ मार्ग जाणून घ्यायचे असतील तर नक्की कमेंट करा...!

आणि मग Nike ची मार्केटिंग चालू झाली... 💪💪💪

Nike ने ४०० ऑलिम्पियंना ब्रँड अम्बॅसेडर  म्हणून शोधले...आणि त्यांना फक्त देण्यात आलेलं Nike शुज घालण्यास सांगितले..! 👀👀👀

Volt नावाचे , एक विचित्र लाइनअप असलेले पिवळसर हिरव्या  रंगाचे शूज घेऊन आले आणि ते आपल्या ब्रँड अम्बॅसेडर स्पर्धेच्या दरम्यान वापरण्यास सांगितले.👀



त्यांनी विशेषत: पिवळसर हिरव्या रंगाची निवड का केली असावी ? 😵

 तर तो  रंग ऑलिंपिक्सच्या ट्रॅकच्या परिपूर्ण कॉन्ट्रास्टमध्ये होता.. तो कलर प्रेक्षकांना खूप आकर्षित करत होता.

"इंद्रधनुष्याच्या सर्व रंगांपैकी, मानवी डोळा आणि व्हिज्युअल सिस्टम पिवळ्या / हिरव्या झोनसाठी सर्वात संवेदनशील आहे, जेव्हा लंडन ऑलिम्पिक ट्रॅक लालसर असतो तेव्हा पार्श्वभूमी अत्यंत विरोधाभासी असते तेव्हा या व्हिज्युअल सिग्नलची शक्ती मोठ्या प्रमाणात दर्शविली जाते."

मानवी डोळ्यामध्ये Volt च्या पिवळसर हिरव्या रंगास लाल रंगापेक्षा जास्त प्रमाणात संवेदनशीलता असते.



या वरून असे समोर आले की...



Adidas चे ऑलिम्पिकशी संबंधित एकूण ९,००० ट्विट करण्यात आले. पण ...

Nike चे ऑलिम्पिकशी संबंधित एकूण तब्बल १६,००० ट्विट करण्यात आले.😎😎😎


तसेच ऑलिम्पिक स्पर्धेच्या काळात... ( स्पर्धेच्या शुभारांभापासून ते सांगता होई पर्यंत )


Adidasचे सोशल मिडीया वर १२,००० नवीन फॉलोअर्स  वाढले गेले पण....

Nike चे सोशल मिडीयावर तब्बल ५७,००० नवीन फॉलोअर्स  वाढले गेले...!😎😎😎

ऑलिम्पिक स्पर्धा पूर्ण झाल्या नंतर यु. एस. मध्ये एक सर्वे घेण्यात आला... त्या मध्ये लोकांना विचारण्यात आले की,

तुम्हाला काय वाटतं लंडन ऑलिम्पिक स्पर्धेचा ऑफिशियल स्पोर्ट्सविअर स्पॉन्सर कोण होते ?


२१ % लोकांनी  Adidas हे उत्तर दिले 😉 पण...

चक्क ३७ % लोकांना वाटलं कि Nike हा ऑफिशियल स्पॉन्सर होता...! 😁😁😁

या वरून असे कळत होते की लाखो करोडो प्रेक्षकांना वाटत होते की  Nike हाच ऑफिशियल स्पॉन्सर होता....!


तब्बल १५० मिलिअन डॉलरची स्पॉन्सरशिप मिळवून ही  Adidas ला अधिक प्रेक्षकांच लक्ष वेधण्यास नाही जमल...😰😰

आणि Nikeने स्पॉन्सरशिप शिवाय लाखो प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेतले...!😎😎😎


या वरून समजते कि ...प्रत्येक वेळेस फक्त पैसा हाच तुमच्या व्यवसायास मोठा बनवतो असे नाही तर त्या बरोबर तुमच्या व्यवसायात नवनवीन संकल्पना देखील आणाव्या लागतील !


अधिक माहितीसाठी आज संपर्क करा :-

संघटीत महाराष्ट्र

sanghatitmaharashtra@gmail.com

७३५०६७८४७२ / ८०९७०४१५७१

Post a Comment

4 Comments